नगर :जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक वेगवेगळ्या आरोपामुळे मागील अडीच वर्षांपासून कायमचं चर्चेत राहिलेली आहे. शिक्षकांच्या बँकेने शताब्दी वर्षात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा आणखीन एक विक्रम स्वत:च्या नावावर केलेला आहे.
अडीच वर्षात तब्बल सहा वेळा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया केलेली आहे. हा एक अनाेखा विक्रम सत्ताधारी संचालक मंडळाने आपल्या नावावर केलेला आहे.
जिल्हा प्राथमिक बॅंकेचा कारभार टि20 क्रिकेटच्या सामन्या प्रमाणे सुरु आहे. कमी चेंडूत जादा धावा करण्याची किमया टी20च्या सामन्यात करावी लागते. तशीच किमया आताचे सत्ताधारी बॅंकेत करीत आहेत. त्याला नेत्यांचीही साथ मिळालेली आहे.
कमी दिवसात सगळ्या संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्ष हाेण्याची संधी आता देण्याचा कसाेसीने प्रयत्न बॅंकेत करण्यात आलेला आहे. त्यात काहीजण खूश झालेले आहेत. तर काही नाराजही झालेले आहेत. मात्र एक दाेन महिन्यांची संधी देऊन माजी अध्यक्ष अशी उपाधी मिळत असल्याने काही त्यावरही समाधान मानत आहेत
बॅंकेत शिक्षक अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या टी 20 सामान्यात आता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधीच्या रुपाने खेळण्याची संधी काेणाला मिळणार याचीच उत्सुकता लागलेली आहे. कमी चेंडूचा (कमी दिवसांचा) खेळ खेळून पाय उतार हाेताना अनेकांच्या मनात आपल्याला काहीच ठाेस करता आले नाही, असे शल्य राहत आहे.
पद मिळेल, काम करण्याची संधी मिळेल, या आशेनेच काही संचालक सत्ताधारी गटात सामील झाले हाेते. परंतु दिवस थाेडे साेंगे फार या म्हणी प्रमाणे नेत्यांनाही आता सर्वांनाच खूश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
आगामी निवडणूक डाेळ्यासमाेर ठेऊन काेणाची नाराजी नकाे म्हणून प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्नात सत्ताधारी गटाने चेअरमन पदाचे पुरते अवमुल्यान करून अध्यक्ष व उपाध्यक्षांना अवघा दाेन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ देऊन खूश ठेवण्याच्या प्रयत्नातूनच सातव्यांदा अध्यक्षपदाचा पाळणा हलणार असल्याची आता जिल्ह्यात खमंग चर्चा सुरु आहे बॅंकेतील कारभाराची खिल्ली उडविण्याआहे.प्रयत्न सर्वसामान्य सभासद सोशलमिडीयातून करीत आहेत.
Post a Comment