नारी शक्ति सन्मान पुरस्कार...

राहुरी : युगंधरा सामाजिक व सौंस्कृतिक ग्रूपच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधुन राहुरी शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व महिला डॉक्टर व न्यायदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व महिला वकील तसेच जीवनात संघर्ष करून मुलांना घडवणाऱ्या आदर्श माता यांना नारीशक्ति सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.


राहुरी येथे युगंधरा प्रतिष्ठान अंतर्गत महिला दिानानिमित्त नारीशक्ती सन्मान पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राहुरी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या महिला डॉ. सुवर्णा गोलेचा, मनीषा दूस, विजय घोरपडे, दीप्ती भंडारी ,सोनल बलदवा, अश्लेषा गव्हाणे चेतना कुलकर्णी, अर्चना पाटील, प्रतिभा खाबिया, दीपा कुसळकर, शिल्पा भागवत, मनीषा निमसे, वृषाली कोरडे, अरुणा भंडारी, राजश्री खरे, पूनम शिरसाठ व न्यायदानाच्या क्षेत्रात महिला वकील पल्लवी कांबळे, कल्याणी पागिरे, अनिता तोडमल, कल्पना साळवे, सविता  गांधले तसेच आदर्श माता चंद्रकला तनपुरे, जिजाबाई भुजाडी, कमलबाई लुक्कड, कमलबाई सुराणा, अरूणाबाई धागुडे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या  मुलांचा घडवले अशा आदर्श माता या सर्वांचा सन्मान शाल गुच्छ व ट्रॉफी देऊन करण्यात आला.  

तसेच युगंधरा प्रतिष्ठान अंतर्गत संस्थापक अध्यक्ष विद्या करपे या गेल्या अकरा वर्षापासून संघटनेच्या सदस्य व पदाधिकारी यांच्या समवेत गरजू अंध, अपंग, अनाथ तसेच अनेक वृद्धाश्रम ,अनाथ आश्रम ,अत्याचारित महिला तसेच गरजू विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेजमध्ये शैक्षणिक साहित्य, मुलांची फी भरणे अशी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. तसेच सौंस्कृतिक वारसा असलेले सर्व सण ,थोरा मोठ्यांच्या जयंत्या , ऊत्सव साजरे केले जातात.

श्री संत गाडगे बाबा आश्रम शाळा येथे नुकताच नारीशक्ती सन्मान आयोजित करण्यात आला कार्यक्रमास मा. सभापती वंदना मुरकुटे, सूर्यकांत भुजाडी मा.उपाध्यक्ष नगरपालिका , साईआदर्श मल्टिस्टेस्टचे अध्यक्ष मा.शिवाजीराव कपाळे , ह.ब.प.गिता माई ढसाळ,  जिजाबाई भुजाड़ी, रजनी  शेट्टी, ब्रह्मकुमारी खुशी दीदी नायब तहसीलदार पूनम दंडेले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितित कार्यक्रम पार पडला.

राहुरीत प्रथमच महिलानी महिलांसाठी आणि त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून हा सामाजिक बांधीलकी जोपासनारा कार्यक्रम घडवुन आणला असे वक़्तव्य युगंधराच्या विद्या करपे यानी केले मंजुशा धावडे, मंगल सुराणा, गीता जग्गी, डॉ राधा गमे, शुभांगी शिंदे, सुनंदा परदेशी , शोभा भुजाड़ी, वंदना परदेशी दर्शना लुक्कड़ आणि युगंधरा ग्रूपच्या सर्व सन्माननीय सदस्य यांनी कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी नियोजन केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन राजेश मंचरे  यांनी केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post