नगर : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठविलेल्या नोटिशीची रविवारी नगर शहर भाजपने प्रोफेसर चौकात सरकार विरोधी घोषणा दिल्या. फडणविस यांना बजावलेल्या नोटीशीची यावेळी होळी करण्यात आली.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, विवेक नाईक, महेश नामदे, सुनील रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी, मालण ढोणे, रविंद्र बारस्कर, मनोज कोतकर, उदय कराळे, विलास ताठे आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठविलेल्या नोटिशीची रविवारी भेंडा (ता. नेवासा) येथे होळी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने पोलिसांना ही नोटीस पाठवायला लावली, असा आरोप करत नेवासा तालुका भाजपच्या वतीने राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, येडूभाऊ सोनवणे, अण्णा पाटील गव्हाणे, महेश नवले, देवेंद्र काळे, विनायक मिसाळ, समीर शेख, जावेद शेख, संभाजी मिसाळ, पिंटूशेठ वाघडकर, भाऊसाहेब शिरसाठ, राजेंद्र नवले, अविनाश सरोदे, बाबासाहेब शिरसाठ, नवनाथ फुलारी आदी उपस्थित होते.
Post a Comment