फसवणुकीचा गुन्हा प्रवीण दरेकर यांच्याविरोधात दाखल...

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक मजूर नसतानाही याच प्रवर्गातून लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. 


प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. हा गुन्हा आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन नोंदवण्यात आला आहे.

प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत ते निवडूनही आले होते. प्रवीण दरेकर यांनी या प्रकारामुळे बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबै बँकेवर संचालक म्हणून प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. 

1997 पासून दरेकर मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post