पाथर्डी : देशातील पाच पैकी उत्तरप्रदेश,उत्तराखंड, गोवा व मणिपुर या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्याने आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी सुरू झाली. प्रत्येक राज्याचे निकाल येऊ लागले. पाच राज्यापैकी राजकीय दृष्टया महत्वाचे समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा व मणिपूर राज्यात भाजपाला भरघोस यश मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसत होता.
दुपारी चार वाजता शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकात विजयाच्या घोषणा देत फटाके फोडून,पेढे वाटुन आंनदोत्सव साजरा केला.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,शहराध्यक्ष अजय भंडारी,जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,
जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युजंय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, पं.स.सदस्य विष्णुपंत अकोलकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, संदिप पठाडे, काकासाहेब शिंदे, भगवान साठे,बजरंग घोडके, महेश बोरूडे, बबन बुचकुल, अनिल बोरूडे, रमेश हंडाळ, मंगल कोकाटे, प्रा.रमेश काटे, अशोक मंत्री, नारायण पालवे, युसुफ शेख,आदिनाथ धायतडक, जमीर आतार, अर्जुन धायतडक, सचिन पालवे, बाळासाहेब ढाकणे, महेश अंगारखे, संदिप पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची बहुमताकडे घोडदौड सुरू असल्याचे वृत्त कळताच आम आदमी पार्टीच्या वतीने सकाळीच शहरातील स्व.वसंतराव चौकात ढोलताशा वाजवत,फटाके फोडून, पेढे वाटुन आम आदमी पक्षाच्या पंजाब विधानसभा निवडणुकीतील यशाचा आनंदोत्सव साजरा केला.आम आदमी पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, गोरक्ष ढाकणे, देविदास घुगे, सादिक शेख, गोरक्षनाथ शिरसाट आदी उपस्थित होते.
Post a Comment