चीनपाठोपाठ अमिरेकेतही कोरोनाचा कहर...

वॉशिंग्टन : चीनपाठोपाठ आता अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकेवर काढले आहे. अमेरिकेत लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल 2 लाख 70 हजार मुलं कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. गेल्या आठवड्यात 31 हजार 991 मुलं पॉझिटीव्ह झाली. 


सप्टेंबर 2021च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत 77 लाख मुलांना लागण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेतील 1 कोटी 28 लाख मुलं कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. अमेरिकेतील तब्बल 19 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला आहे. 

यावरून अमेरिकेत लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दुसरीकडे चार महिन्यांपूर्वी बिजिंगमध्ये झालेल्या विंटर ऑलिम्पिकनंतर चीनमध्ये रुग्ण वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.

चीनमध्ये आणखी दोघांचा बळी गेला असून मृतांचा आकडा 4 हजार 638 झाला आहे. अर्थात हे दोघे ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यातल्या एकानं लस घेतली नव्हती, असे चीनच्या आरोग्य अधिका-यांचे म्हणण आहे. 

मात्र अमेरिका आणि चीनमधून येत असलेल्या या बातम्या सावध करणा-या आहेत. कारण अनेरिका-चीनमधून जगात कोरोना कसा पसरतो हे यापूर्वीच्या तीन लाटांमध्ये आपण पाहिले आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post