लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा....

श्रीगोंदा : दाखल असलेल्या किरकोळ गुन्ह्यात न करण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील अटक अंमलदाराने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुन्हा दाखल झालेला पोलिस अंमलदाराचे नाव संजय बबन काळे असे आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या किरकोळ गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाची अटक टाळण्यासाठी व आरोपीच्या बाजूने मदत करण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील अंमलदार संजय बबन काळे (वय 32 वर्षे) याने 10 मार्च 2022 रोजी तक्रारदारास 20 हजाराची लाच मागितली. 

यानंतर तडजोड होऊन 17 हजाराच्या लाचेची मागणी स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने आज संजय काळे याच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पो. नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, पो. अंमलदार वैभव पांढरे, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली आहे.

दरम्यान ही कारवाई झाल्यानंतर पोलिस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  पोलिस अंमलदार संजय काळे हा 2017 साली तोफखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीस असतांना लाच घेताना रंगेहात पकडला होता. आता पुन्हा तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post