कोरोनाचा कहर वाढल्याने....चीनमधील शाळा बंद...

शांघाय : 2019 मध्ये वुहान शहरात झालेल्या कोरोना विस्फोटाप्रमाणे पुन्हा एकदा चीनमध्ये महामारी पसरण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्या तीन हजार 393 कोरोना रुग्ण आढळळे आहेत. सुमारे दोन वर्षांनंतर चीनमध्ये पहिल्यांदाच 3 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चीनमधील नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे. 


कोरोना महामारीचा उद्रेक पाहाता चीनमधील काही शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण चीनमधील टेक हब म्हणून ओळख असलेल्या शेन्जेन शहरात रविवारी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहराची लोकसंख्या एक कोटी 75 लाख 60 हजार इतकी आहे. या शहरात रविवारी 66 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शेन्जेन हे शहर हाँगकाँगच्या सीमेवर आहे. सध्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काळजी म्हणून स्थानिक प्रशासनाने शेन्जेन शहरात लॉकडाऊन लागू केला आहे.  कोरोनाचा ननीव व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले.

चीनमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून शांघायमधील शाळा सध्या बंद केल्या आहेत. यासोबतच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील सुमारे 19 प्रांतांमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांचा प्रादुर्भाव आहे. 

जिलिन शहर अंशतः बंद करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेला लागून असलेले हुनचुन शहर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे 1 मार्चपासूनच बंद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात तीन तात्पुरती रुग्णालये बांधण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post