कर्जत : नागलवाडी (ता. कर्जत) येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. किरकोळ वादातून लालचंद राजमल सोळंकी (वय ४०, रा. नागलवाडी ता. कर्जत) हे मयतचे नाव आहे.
विजयकुमार सोळंकी (वय ४८) यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय रामदास माने आणि पांडुरंग मच्छिंद्र माने (रा. नागलवाडी, ता. कर्जत) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, आशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील नागल वाडी येथे ता ८ मार्च रोजी विजय रामदास माने यांनी फिर्यादी विजयकुमार सोळंकी यांच्या घरासमोर ट्रॉली लावली.
त्यावेळी त्यांची पत्नी सुनीता हिने घरासमोरील पाईप फुटेल ,आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही लावू नका अशी विनंती केली .त्यानंतर विजय माने आणि पांडुरंग माने यांनी विजयकुमार सोळंकी,त्यांची पत्नी सुनीता आणि भाऊ लालचंद यास मारहाण केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ९ मार्चला लालचंद सोळंकी यांनी विजय माने याना तू मला का मारहाण केली?असा जाब विचारला असता त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली.मात्र फिर्यादी विजयकुमार सोळंकी आणि त्यांचा बंधू लालचंद सोळंकी हे व्यसनी असल्याने नको वाद म्हणून त्यांनी फिर्याद दिली नाही. असे फिर्यादीत म्हटले आहे.
Post a Comment