नगर : पतीने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारुन तिचा निर्घृण खून केल्याची घटना जामखेड रोडवरील वैद्य कॉलनीत सोमवारी (दि. १४) रात्री ११.१० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी आरोपी सुनील हिरामण वैराळ याला अटक केली आहे.
याबाबत गंगाधर नवनाथ लोंढे (रा.गणपती मंदिराजवळ, वैद्य कॉलनी, जामखेड रोड) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोंढे यांच्या घरात आरोपी सुनील वैराळ व त्याची पत्नी मंदा वैराळ हे भाडेकरू म्हणून राहत होते.
सोमवारी रात्री पती-पत्नीत भांडण झाले. या भांडणात सुनील वैराळ याने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारला. त्यामुळे ती गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाली.
याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळताच साहायक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी जावून आरोपी सुनील वैराळ यास ताब्यात घेतले.
Post a Comment