रोडरोमिओला विद्यार्थीनींनी धुतले...

जळगाव :  रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. या रोडरोमियोला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये एका रोडरोमिओला शाळकरी मुलींनी  चोप दिला. बस बंद असल्याने येवतीमधल्या मुली पायी शाळेत जायच्या. हा तरुण त्यांना रोज छेडायचा. या त्रासाला मुली कंटाळलेल्या होत्या. अखेर मुलींनी त्याला चांगलाच चोप दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेत जात असताना आजही असाच प्रकार या तरुणाने केल्यावर संतप्त झालेल्या या मुलींनी आपला रुद्रावतार दाखवत या तरुणाला चपलानी चांगलाच चोप दिला. त्याला चांगलीच अद्दल घडविली आहे. स्थानिकांनीही तरुणाला मारहणा केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post