दोन गटात हाणामारी...

नगर : शहरातील दाणेडबरा परिसरात लहान मुलांमधील क्रिकेट मॅचच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी वाहनांची तोडफोड करून दगडफेक करण्यात आली.  या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. 


याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये रोहित फंड, भावड्या उर्फ किशोर बेंद्रे, गोपाल मालपाणी, अक्षय भिंगारदिवे, कैलास हुंडेकरी, मोसिन सादिक शेख, आकाश मुर्तडकर, शहाबाज एजाज शेख, सलमान आरिफ शेख, सईद मोहम्मद हुसेन शेख व इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दाणे डबरा परिसरात प्लास्टिक बॉलवरील क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आयोजित आली होती. यावेळी परिसरातील दोन संघामध्ये सामना सुरू असताना वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान दगडफेक व तोडफोडमध्ये झाले. त्यामुळे परिसरात धावपळ सुरु झाली. 

या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान आहे. दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर. उपनिरीक्षक समाधान सोळंके, कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे आदींसह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post