मुलाला गळफास देत आईची आत्महत्या...

धुळे : वाद झाल्‍याने घरात कोणी नसताना नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला स्वतः जन्मदात्या आईनेच फाशी देत स्वतः आईने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे  तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात घडली आहे. 


वनी बुद्रुक (ता. धुळे) या गावामध्ये सोनल सुधाकर माळी (वय 23) व हर्षल सुधाकर माळी (वय नऊ महिने) अशी मयत माय-लेकाची नावे आहेत. घरगुती वादातून या मातेने आपल्या चिमुकल्या बाळाला संपवून स्वतः देखील या जगाचा निरोप घेतला.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.या प्रकरणात नेमके कोण दोषी आहेत, याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post