कारागृहातून पळालेल्या आरोपीला अटक...

राहुरी : कारागृहातून खिडकीचे गज कापून पलायन केलेल्या भांड टोळीतील माळीला स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे.


माजलगाव (जि. बीड) येथे  नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय २२, रा. मोरे चिंचोली, ता. नेवासा) याला अटक करण्यात आली आहे.  

१८ डिसेंबर 2021ला पहाटे कारागृहाच्या खिडकीचे गज कापून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई झालेला टोळी प्रमुख सागर भांड याच्यासह पाच जणांनी पलायन केले होते. 

त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून सागर भांड, किरण अजबे, जालिंदर  सगळगिळे यांनी अटक केली. परंतु नितीन उर्फ सोन्या माळी व रवी पोपट लोंढे पसार होण्यात यशस्वी झाले होते. त्यातील नितीन माळी याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी रवी लोंढे अद्याप पसराच आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post