नगर : लग्नाची मागणी केल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयशीला मारहाण केली. भिंगार उपनगरामध्ये शनिवारी (ता. 5) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
तरुणीचे गेल्या सहा वर्षांपासून नालेगावातील एका तरुणासमवेत प्रेमसंबंध होते. तिने या तरुणाकडे लग्न करण्याची मागणी केली.
या मागणीचा राग आल्याने तरुणाने पाच- सहा मित्रांच्या मदतीने प्रेयशीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आर. टी. गोरे पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Post a Comment