मुंबई : युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगभरात परिणाम होत असून सोन्याच्या किमतीवरही त्याचा परिमाण झाला आहे. आज सोन्याचा दर 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर येत्या काही दिवसांत सोनं 54 हजारापर्यंत सोन्याचा भाव पोहोचू शकतो, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.
वाढत्या तणावादरम्यान या आठवड्यात सोने दरात मे 2021 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक वाढ पाहायला मिळाली. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे बाजारात रिस्क सेंटिमेंट वाढला आहे. त्यामुळे अशा अनिश्चिततेच्या वातावरणात लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढला आहे. रशिया-युक्रेन युद्धाने गंभीर स्वरुप घेतलं आहे. त्यामुळे याचा परिणाम सोने दरावरही होत असून सोने दरात वाढ पाहायला मिळत आहे.
त्याशिवाय इतर कमॉडिटी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत आलेल्या वाढीमुळे महागाईसंबंधित चिंताही आणखी वाढली आहे. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे वळले आहेत.
Post a Comment