स्वाभिमानी आक्रमक... राज्यभर चारला चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आणखीनच आक्रमक झाली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे. 


सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. चार मार्चला राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणाकरण्यात आली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली.

'या' मागण्यांसाठी सुरू आहे धरणे आंदोलन - शेतीला दिवसा 10 तास विनाकपात वीज द्या, शेतीपंपाच्या वीज बिलांची तत्काळ दुरूस्ती करावी, शेतीपंपाची कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे, अन्यायी वीज बील वसुली थांबवावी आदी मागण्यासाठी 

गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. 22 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेट्टी आता आक्रमक झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post