राज्यस्तरीय कोअर कमिटीत राम शिंदे...

मुंबई : मुंबईत झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकांसाठी व व्यूरचना आखण्यासाठी राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी नेमण्यात आली. या कोअर कमिटीमध्ये माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. 


महाराष्ट्रातील पक्षाचे भविष्यातील कार्य , नियोजन, दौरे, यात्रा, प्रचार , प्रसार व आगामी सर्व निवडणुकीचे उमेदवार निवडणे  यासाठी ही समिती कार्य करते.

जिल्ह्यातील भाजपाचे दिवंगत नेते सूर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे यांच्या नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने या विस्तारित कोअर कमिटीवर सदस्य म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाल्याने भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

पक्षाने दिलेल्या गोवा येथील विधानसभा निवडणुकीची ही जबाबदारी शिंदे यांनी अतिशय जबाबदारी व नेटाने पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकौशल्याने नक्कीच त्यांना दिलेल्या मतदारसंघात निकालाच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसणार आहे.

नक्कीच शिंदे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या या जबाबदारीच्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कार्यकुशलतेने व समयसुचकतेने भाजपाचे कार्य चांगल्या पद्धतीने करून पक्ष वाढीचे प्रयत्न करतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post