डाटा संपला तरी डाटा उपलब्ध होणार...

मुंबई : मोबाईलचा डाटा संपल्यावर अनेकांची धावपळ पडते. मात्र आता डाटा.संपला तरी निश्चित रहा. लगेच डाटा.मिळत आहे. जिओने आपल्या ग्राहकांना तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


रिलायन्स जिओने  टेलिकॉम सेक्टरमध्ये  नवी क्रांती घडवली. जिओने धमाकेदार प्लन्समुळे अनेक ग्राहकांना आपल्यासोबत जोडून ठेवले आहे. जिओ आपल्या ग्राहकांना नेहमीच विशेष सेवा देण्याचा प्रयत्न करत असते. फोर जी  सेवा आल्यापासून मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. 

टेलिकॉम कंपनीकडून मिळणारा इंटरनेट कधीकधी संपतो. त्यामुळे अनेकदा गैरसोय होते. मात्र डेटा संपल्यानंतरही आता तुमची गैरसोय होणार नाही. जिओ डेली लिमिट संपल्यानंतरही मोफतमध्ये इंटरनेट सेवा पुरवत आहे.

जिओ आपल्या यूझर्ससाठी एक सेवा प्रदान करतं. 'जिओ एमरजन्सी डेटा व्हाउचर' असं या व्हाउचरचं नाव आहे. हा डेटा प्लॅन त्या यूझर्ससाठी बेस्ट आहे, ज्यांना दररोज मिळणारा इंटरनेट संपून जातं आणि रिचार्ज करण्यासाठी पैसे नसतात. या व्हाऊचरनुसार, जिओ तुम्हाला कर्ज  म्हणून डेटा देत आहे.

जिओची ही सेवा अडी-अडचणीला फार फायदेशीर ठरते. या व्हायऊचरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी माय जिओ अ‍ॅप   डाऊनलोड करावा लागेल. या अ‍ॅपमधील मेनूत मोबाईल सर्व्हिसेज ऑप्शनवर टॅप करा. तिथे तातडीचे डेटा व्हावचर दिसेल.

 तो सिलेक्ट करा. त्यानंतर गेट इमरजंन्सी डेटा वर क्लिक करा. यानंतर पुढे एक्टिव्हेट नॉव  टॅप करा. अशा प्रकारे तुम्हाला 2 जीबी डेटा कर्ज म्हणून मिळेल.

कर्ज म्हणून घेतलेल्या या 2 जीबी डेटासाठी तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतील.  हे पैसे ही तुम्हाला माय जिओ अ‍ॅपच्या मदतीनेच परत करायचे आहेत.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post