जोधपूर : एका सरकारी शाळेत एका शिक्षकाने त्याच्या सहकारी शिक्षिकेसोबत वारंवार विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना घरी सांगितली. त्यानंतर संपूर्ण गावाने शाळेवर मोर्चा काढला. शाळा प्रशासनाला संबंधित शिक्षक-शिक्षिकेला तातडीने बडतर्फ करावे लागले आहे.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवली ब्लॉकमधील श्रीनगर गावातील आहे. शाळेचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोपांनुसार शाळेत कार्यरत असलेला एक शिक्षक आणि शिक्षिका नेहमी सातत्याने अश्लील कृत्य करायचे.
ते विद्यार्थ्यांसमोरही किळसवाणा प्रकार करणे सोडायचे नाहीत. त्यामुळे अखेर शाळेच्या मुलांनी संबंधित कृत्याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. संबंधित प्रकारामुळे मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. या विचाराने संपूर्ण गाव क्रोधित झाले आहे.
शिक्षक-शिक्षिकेच्या अश्लील कृत्यामुळे रागावलेलं आख्ख गाव बुधवारी (3 मार्च) शाळेसमोर दाखल झालं. गावकऱ्यांनी संबंधित शिक्षक-शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली. विशेष म्हणजे गावकरी इतके संतापले होते की त्यांनी शाळेच्या गेटला कुलूप लावले.
अखेर गदारोळाचा आवाज ऐकू आल्यानंतर शाळेचे मुख्यध्यापक बाहेर आले. त्यांनी गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी एकूण घेण्याच्या मनस्थित नव्हते. अखेर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला याबाबत महिती देण्यात आली. त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं.
पण तरीही गावकरी ऐकून घेत नव्हते. संबंधित शिक्षक-शिक्षिकेला शाळेतून कामावरुन काढून टाका, या मागणीसाठी ते अडून राहिले.
अखेर हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेलं. देवलीचे एसडीएम भारत भूषण गोयल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत संबंधित शिक्षकांना कामावरुन काढून टाकण्याचे निर्देश दिले.
Post a Comment