पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले छोट्या वैज्ञानिकांचे प्रदर्शन

नगर : पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करताना विज्ञान प्रदर्शन व विज्ञान या विषयावर प्रश्नमंजूषा घेण्यात आली. विज्ञान प्रदर्शनात अगदी इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता नववीपर्यँतच्या विद्यार्थ्यांनी  भाग घेतला होता. जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांनी यात आपली उपकरने तयार करून त्यांची माहिती इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली. 


यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका नलिनी काटरपवार, डायना सत्राळकर, पूनम जाधव, शुभांगी यादव आणि दृष्टी अलरेजा यांनी विद्यार्थ्यांना उपकरणे तयार करण्यासाठी व निवडीसाठी विशेष मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची उपकरणे या प्रदर्शनात तयार केली होती. 


याप्रसंगी विदयार्थ्याना मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य मा. श्री. मंगेश जगताप यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की अनेक नवनवीन प्रयोग करून पाहा. विज्ञानाची कास धरा त्यातून तूमची प्रगती तर होईलच, त्याबरोबर भविष्यातील नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठीच हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. 

तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला अगदी इ.१ली व २री च्या विद्यार्थ्यांनी पण मोठ्या संख्येने यात भाग घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. गेली दोन वर्षे शाळेत विज्ञान प्रदर्शन झाले नव्हते. त्यामुळे अगदी पहिली पासून ते नववी पर्यँतच्या सर्व विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांना याप्रसंगी  त्यांनी शाबासकी दिली, कौतुक केले. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका डायना सत्राळकर यांनी केले. सुरेश शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post