भाजपाला खिंडार... तालुकाध्यक्षांसह अनेकजण राष्ट्रवादीत दाखल...

राहुरी : राहुरीमध्ये भाजपाला खिंडार पडले आहे. भारतीय जनता पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.


हा पक्ष प्रवेशाचा सोहळा मुंबई येथे   राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते भनगडे यांचा सत्कार करण्यात आला. 

भनगडे यांच्यासह उपसरपंच पोपटराव कोबरणे, गणेगाव  सोसायटीचे अध्यक्ष बापू कोबरणे माजी उपसरपंच गंगाधर कोबरणे,मंजाबापू कोबरणे सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब कोबरणे, बबनराव कोबरणे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी सुयोग नालकर, अनिल घाडगे गंगाधर हारदे ,बापू जगताप, पप्पू माळवदे ,भारत भुजाडी किरण गव्हाणे ,संतोष आघाव,राजेंद्र बोरकर  उपस्थित होते. 

या  सर्व घडामोडींमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  चार दिवसांपूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष व उपसरपंच दिपक वाबळे वरशिंदे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. 

आता थेट तालुकाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तालुका भाजपामध्ये खळबळ उडाली आहे. राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आता तालुकाध्यक्ष भनगडे यांनी प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विविध सहकारी सेवा संस्था यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post