आवक वाढल्याने लिंबाच्या भावात घसरण...

नगर ः दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाच्या भावात घसरण झालेली आहे. शनिवारच्या तुलनेत आज आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. 


दादापाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज भाजीपाल्यांचे लिलाव होत असतात. त्यामध्ये लिंबाचेही लिलाव झालेल आहेत. लिलावासाठी 17 क्विंटल 65 किलो लिंबाची आवक झाली. 

यामध्ये कमीत कमी तीन हजार ते जास्तीत जास्त नऊ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला. सरासरी सहा हजार रुपये क्विंटल दराने लिंबाची विक्री झाली. 

शनिवारच्या तुलनेत आज लिंबाची दीड क्विंटलने आवक वाढलेली होती. तसेच भावातही एक हजाराने घसरण झालेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post