नगर : तरूणीला दारू पाजून बेशुध्द केले व तिच्यावर अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी दोघा भावांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण नामक गोघा भावांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. तरूणी घरी एकटीच असताना तुषार व रोनक हे दोघे तिच्या घरात आले व म्हणाले, ‘ आम्हाला जेवण करायचे आहे.
तेव्हा तरूणी त्यांना म्हणाली, ‘ तुम्ही आधी घराबाहेर जा, माझ्या घरात तुम्हाला जेवण मिळणार नाही’. तेव्हा तुषारने तरूणीला धरले व रोनकने खिशातून दारूची बाटली काढून तरूणीला दारू पाजली.
दारू पाजल्यामुळे तरूणी बेशुध्द झाली यानंतर दोघांना तरुणीवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Post a Comment