अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्याची पूर्वीची ओळख लिंबू उत्पादकांचा तालुका म्हणून होती. तिच ओळख आता पुन्हा निर्माण होऊ लागली आहे. सध्या श्रीगोंद्यातील लिंबाला "सोन्याचे" दिवस आले असल्यामुळे शेतकरी राजा समाधानी झाला आज लिंबाला १२१ रुपयांचा भाव मिळाला आहे.
सध्या श्रीगोंदा तालुक्यात लिंबाने शंभरी पार केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच बाजारभाव ही वाढत चालले आहेत. आज श्रीगोंद्यातील लिंबाला १२१ रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे
आगामी काळात ही वाढ सुरुच राहणार असल्यामुळे उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. लिंबू हे एकमेव फळ आहे. कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देते. लिंबाची शेती पारंपारिक पद्धतीने केल्यास निश्चित फायदा होतो. मी माझ्या बागेला फक्त शेणखत वापरतो. वर्षाला सरासरी पाच लाखाचे उत्पन्न मिळवतो, अशी प्रतिक्रिया लिंबू उत्पादक शेतकरी अनिल वाळके यांनी दिली.
Post a Comment