डिझेलच्या भावात वाढ....

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम आता भारतातील इंधन दरावरही होऊ लागला आहे. याआधी विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात दरवाढ झाल्यानंतर आता घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 25 रुपयांची दरवाढ सहन करावी लागणार आहे. 


मात्र, या दरवाढीचा परिणाम पेट्रोल पंपावरून वाहनांमध्ये डिझेल भरणाऱ्या ग्राहकांवर होणार नाही. किरकोळ ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुंबईत घाऊक ग्राहकांसाठी डिझेलचा दर 122.05 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर, पेट्रोल पंपांवर 94.14 रुपये प्रतिलिटर या दराने डिझेल विकले जात आहे. 

त्याचप्रमाणे दिल्लीतील पेट्रोल पंपावर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर, घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत 115 रुपये प्रति लिटर आहे. 

आगामी काळात डिझेलच्या भावातवाढ होण्याची शक्यता आहे. ही भाववाढ 15 ते 25 रुपये लिटरमागे होऊ शकते, असे मत व्यक्त होत.आह.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post