श्रीगोंदा : उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले आहेत. त्यामुळे आता लिंबाला मागणी वाढू लागली आहे. परिणामी गावातही वाढ झाली आहे. सध्या तरी 101 रुपये रिले दराने लिंबाची खरेदी होत असली तरी आगामी काळात लिंबाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने लिंबाला परराज्यात मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे लिंबाला चांगले दिवस आले आहेत. आगामी काळात.150.रुपये किलो रुपयांपर्यंत लिंबाचे भाव जाण्याची शक्यता आहे. मात्र लिंबू उत्पादकांनी व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे.
सध्या चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गाने सध्या तरी कच्चे लिंबू विक्रीस आणण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊन लिंबाच्या भावात घसरण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकर्याने लिंबाची विक्री करताना परिपक्व मालच विक्रीस आणणे गरजेचे आहे.
सध्या लिंबाला चांगला भाव म्ळत आहे. शेतकर्यांनी लिंबाची विक्री करताना प्रतवारी करून लिंबू विक्रीस आणल्यास त्याला चांगला भाव मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया लिंबू उत्पादक संघाचे गोरख आळेकर यांनी दिली.
Post a Comment