एम. व्ही. देशमुख
नगर : कामगारांमुळे उद्योग व्यवसाय वृध्दींगत होत असतो. त्यामुळे मालकही आपल्या उद्योग व व्यवसायातील कामगारांना चांगल्या सुविधात देत असतात. त्यातून दोघांचाही फायदा होऊन अनेकांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र जिल्ह्यातील कामगारांच्या एका संस्थेतील एका कर्मचार्यांच्या वागण्यामुळे ती संस्थेची वाटचाल डबघाईच्या दिशेने सुरु झाली आहे.
कामगाराने कामगारासारखे राहणे गरजेचे आहे. कामगार जर त्या संस्था व उद्योगाचा मालक बनला तर ती संस्था व उद्योग बंद पडायला वेळ नाही. अशा मालकशाही प्रवृत्तीमुळे जिल्ह्यातील अनेक संस्था डबघाईला आलेल्या आहेत. काहींची वाटचाल डबघाईच्या दृ्ष्टीने सुरु आहे.
जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतील कर्मचार्यामुळे सभासदांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कर्मचारी तेथे कार्यरत असून तो कर्मचारी आता स्वत:ला कर्मचारी न समजता त्या संस्थेचा मालक समजू लागलेला आहे.
संचालकांनी सूचविलेल्या कामाला तो डावलू लागला असून तुम्हाला नाही समजत म्हणून संचालकांचे म्हणणे टाळत आहे. मी संस्था मोठी करण्यात खूप कष्ट केले असून आपल्यामुळेत संस्था आज उभी आहे, असे संचालकांसह सभासदांना तो नेहमीच सांगत आहे. त्याच्या या अरेरावीच्या भाषेला अनेकजण कंटाळले आहेत.
सभासदांची नियमातली प्रकरणे तो नाकारत आहे. संचालकांनी प्रकरणे मंजूर करावी, अशा सूचना देऊनही तो त्याचेच म्हणणे खरे करत प्रकरणे नाकारत आहे. यामुळे अनेकजण आता त्या कर्मचार्याच्या वागण्याला कंटाळून सभासद आता दुसर्या संस्थेचे सभासद होऊ लागले आहेत.
हा प्रकार अनेकांनी संचालकांच्या काणी घातला आहे. मात्र तेही त्यावर ठोस काही उपाययोजना करू न शकल्याने सभासदांनी त्या पतसंस्थेतील आपले सभासदत्व रद्द करून त्यांच्याच कर्मचार्यांच्या दुसर्या संस्थेत सभासदत्व स्वीकारले आहे. दिवसेंदिवस सभासद कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
एकमेव कर्मचार्यामुळे संस्थेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संचालक मंडळाने वेळीच सावध व्हावे, अन्यथा भरभराटीला आलेली संस्था डबघाईला जाईल, असे सभासदांमधून बोलले जात आहे.
Post a Comment