मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे व नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील निफाड व येवला परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला.
सुमारे अर्धातास पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू व द्राक्ष पिकांना फटका बसला आहे.
पुण्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने बळीराजाच्या चिंतेत भर घातली. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना रात्री वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपले. अचानक पडलेल्या या तुफान पावसाने शेतक-यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
काढणीला आलेल्या गहू, कांदा, हरभरा यासारख्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
Post a Comment