पारनेर : पारनेर तालुक्यातील श्री समर्थ अकॅडमी संचलित श्री समर्थ पॉलिटेक्निक (म्हसणे फाटा, ता. पारनेर) या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागल्याची माहिती प्राचार्य भाऊसाहेब अनारसे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या डिप्लोमा इंजीनियरिंग च्या हिवाळी परीक्षा 2021 चे निकाल नुकतेच जाहीर झाले. सदर ऑनलाइन परीक्षा ही प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एका परीक्षकाची नेमणूक करून ऑनलाइन प्रॉक्टरिंग पद्धतीने घेण्यात आली होती.
त्या परीक्षेमध्ये श्री समर्थ पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत भर घालत निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये तृतीय वर्षाच्या भुजबळ श्रुती मिलिंद या विद्यार्थिनीने 91.22 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या शाखेमध्ये तृतीय वर्षामध्ये अनारसे पवन गणेश 87.90 टक्के मिळवून प्रथम आला.
सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये अनुक्रमे रायसोनी संचिता दीपक 88.2 टक्के आणि परड शिवम सुरेश 85 1.05 टक्के गुण मिळवून प्रथम आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संचालक कैलास गाडीलकर व प्राचार्य भाऊसाहेब अनारसे यांनी अभिनंदन केले
Post a Comment