महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कर्मचारी जिजाऊ सावित्री पुरस्काराने सन्मानित...

पारनेर : महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करत असून या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनी शिक्षक परिषद या संघटनेने केला ही अभिमानाची बाब आहे. पुरुषांबरोबर महिला देखील राज्यामध्ये अतिशय कर्तबगारीने पुढे येत आहे हा सर्व महिलांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केले.


पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक परिषद व रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पारनेर तहसील कार्यालय सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी  सुधाकर भोसले होते. 

यावेळी तहसीलदार  शिवकुमार आवळकंठे, मुख्य नायब तहसीलदार आढारी, निवडणूक विभागातील नायब तहसीलदार रणदिवे, कदम, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली आवारी आणि शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी शिक्षक परिषदेने नेहमी शिक्षक हित जोपासत समाजाचा आरसा म्हणून कार्य केले आहे. हे आम्ही वर्तमानपत्रातून वाचतो याचा उल्लेख करत सन्मानित महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वैशाली आवारी यांनी या पुरस्कार्थी महिलांचा आदर्श घेऊन इतर महिलांनी प्रेरीत होऊन कार्य करावे असे सांगत सन्मान केल्याबद्दल शिक्षक परिषदेस धन्यवाद दिले.

परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे म्हणाले की, शिक्षक परिषद करत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. समाजाप्रती उत्तरदायीत्व म्हणून हे कार्य शिक्षक परिषद रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर कार्य करत असते, असे ते म्हणाले.

यावेळी जिजाऊ - सावित्री सन्मान सोहळ्यात" नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिता कुमावत,आरोग्य खात्यातील स्वाती ठुबे, गांजीभोयरे येथील सरपंच अनिता बाचकर, शिक्षक बँकेतील कर्मचारी संगीता रावसाहेब कोल्हे, आदर्श महिला व सामाजिक कार्यकर्त्या  पुरस्काराने सन्मानित वैशाली आवारी, अळकुटी येथील नॅशनल विजेत्या धावपटू भाग्यश्री भंडारी, शिक्षण विभाग सुवर्णा मंडलीक, रुपाली कुबडे, पोलिस खात्यातील वैशाली शिंदे,  किरण बर्वे, मनिषा चव्हाण, संगिता आढाव, रुक्मीणी चाटे, कुंदा साळवे, शबाना शेख यांना सन्मानपत्र, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, एक झाड आवठणीचे, शाल, श्रीफळ  देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती झावरे यांनी केले. यावेळी पोपट नवले, प्रताप खिलारी,संतोष खामकर, संदीप फंड, बाळासाहेब रोहोकले, सुनील दुधाडे , बाबासाहेब धरम, संदिप झावरे, अशोक गाडगे, संतोष चेमटे, अनिल धुमाळ, बाळासाहेब ठाणगे, शिवाजी कोरडे, हरी साळुंके, बाबा औटी, सुंदर सोबले, संदिप सुंबे, स्वाती ठुबे यांच्यासह अनेक शिक्षक बंधू भगिणी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post