वडनेर : सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत महाराष्ट्र रेंजर्स टीमने डॉ. प्रतिक्षा राख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधत एक आगळा वेगळा स्री सन्मान सोहळा आयोजित केला होता.
या साठी त्यांनी ज्या महिलांना गड-किल्ल्यांची आवड आहे. अशा महिलांना आवाहन करून विनाशुल्क सर्व टेक्निकल सपोर्टसह पदरगडाची सफर घडवली. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व थोर महात्म्यांच्या जीवनचारित्रांवरील पुस्तके भेट देऊन स्री वर्गाचा सन्मान करण्यात आला.
गडावर जाताना महिला नव गिर्यारोहकांसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तसेच गड माथ्यावर वनभोजनाचेही नियोजन केले होते.
या वेळी गडाची अवघड असलेली चढण पार करून सर्व महिला गड माथ्यावर पोहोचल्या यामध्ये डॉ. प्रतीक्षा राख, तेजस्विनी गायकवाड, रचना परदेशी, गौतमी येवले, ओवी कोंढारे, हर्षाली माकडे, सोनम डांगी, लीना राऊत, गौरी अतिवाद्कर या महिला सहभागी झाल्या होत्या.
याशिवाय या कार्यक्रमासाठी सर्वाना गड चढण्यासाठी मदत व्हावी आणि आलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये गिर्यारोहक संतोष रामामूर्ति, विजय रोहोकले, अशोक भोसले, विशाल नागवडे,अनिकेत नवले, PSI गायकवाड साहेब, महेंद्र सर, विलास जोडगे यांचे विशेष सहकार्य लाभले
महाराष्ट्र रेंजर्स हा सह्याद्रीचे दर्शन घडवणारा आघाडीचा ग्रुप सर्व सुरक्षेसह टेक्निकल साहित्याचा वापर करून अशा ठिकाणच्या सफरी आयोजित करत असतो.
हा कार्यक्रम यशस्वी आणि सुरक्षित होण्यासाठी टीम महाराष्ट्र रेंजर्स मधील सर्व सदस्यांसह प्रतिक्षा मॅडम, किशोर माळी, प्रदीप गायकवाड, जयेश हरड, निखिल धावडे, अखिल सुळके, प्रतीक घुले, उज्ज्वल चौधरी, लक्ष्मण खोत, कुलदीप काळे,सूरज डेस्ले,जगदीश पालवे सह संपूर्ण टीम ने सहकार्य केले.
Post a Comment