वडनेर : आपल्या व पिलांच्या भुकेसाठी उन्हाचे चटके झेलत दिवसभर ठिकठिकाणी घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांसाठी त्यांना आवडणारे खाद्य व पाणी देण्याची इच्छा अनेकांची असते. पण त्या इच्छेला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी वडनेर बुद्रुक येथील युवा उपसरपंच पूनम खुपटे यांनी 'गुरुकुल कोचिंग क्लासेस' अंतर्गत ‘वडनेर बुद्रुकचे विद्यार्थ्यांनी’ ‘पक्षी, प्राणी वाचवू या’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
गजबजाटापासून दूर, जिथे पक्ष्यांसाठी सुरक्षित वातावरण असते. अशा ठिकाणी पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली. केवळ साहित्य लावले नाही तर त्यामध्ये पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यातून हा उन्हाळा पक्ष्यांसाठी सुसह्य बनला जाणार आहे.
विविध सुरक्षित ठिकाणी पक्ष्यांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असलेली घरटी, पाण्यासाठीची भांडी, धान्य देण्याचे आवाहन पक्षी व प्राणीप्रेमी असलेल्या विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. तसेच अंगणात अथवा पक्ष्यांसाठी गरज असलेल्या ठिकाणी पाण्याची व धान्याची भांडी ठेवायची आहेत.
उन्हाळ्याने लाहीलाही होत असताना पाण्याच्या, अन्नाच्या शोधासाठी पक्ष्यांची होणारी.परवड मृगाच्या पहिल्या सरीपर्यंत सुरू राहणार आहे. या दोन उपक्रमात विद्यार्थी मोलाची साथ देत आहेत.
यामध्ये गौरी साळवे, हर्षदा पवार, प्रियंका येवले, श्रेया चौधरी, सायली पवार, सोहम वाजे, अभिषेक वाजे, सार्थक जगदाळे, मनीष येवले, श्लोक चौधरी, ओम ,साई नऱ्हे, हर्षद येवले, हर्षा गजरे, श्रेयस वायदंडे, सार्थक येवले, कल्याणी पवार, प्रज्वल गजरे, गायत्री येवले, तनुजा पवार, युवराज पवार, कार्तिकी भालेकर,जानव्ही मुरकुटे, श्रावणी वायदंडे,श्रेया वाजे, यश खुपटे,प्रेम वायदंडे, कृष्णा रावळकर, सार्थक बाबर, श्रवण चौधरी या सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीने सहकार्य करून उपक्रम राबविला.
दक्ष साळवे या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने प्राणी,पक्षी यांचे संरक्षण करून आपली वसुंधरा जतन करूया असा नारा दिला.
उपसरपंच पुनम खुपटे यांनी विद्यार्थ्यांना आभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात पशु,प्राण्यांच्या संवर्धनासाठी सद्भावना जागृत करत आहेत त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment