पारनेर : आमदार निलेश लंके व जि. प.सदस्या राणिताई लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पठारवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व निलेश लंके प्रतिष्ठान शाखा उदघाटन कार्यक्रम आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाला.
निघोज-शिरूर रोड ते पठारवाडी या रस्त्यासाठी ५० लक्ष रुपये,गावंतर्गत रस्ता काँक्रीट करणे २० लक्ष स्मशान भूमी सुशोभीकरण करणे-१२ लक्ष रुपये,सिमेंट बंधारा बांधणे-१५ लक्ष रुपये असा एकूण ९७.०० लक्ष रुपये च्या कामाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर रस्त्यांची कामे ही प्रगतीपथावर आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासाकडे आम्ही जातीने लक्ष देत आहोत असा विश्वास व्यक्त केला.
तुम्ही मला मतदारसंघाची जबाबदारी दिली मग मी तुम्हाला विसरलो का ? २४ तास ३६५ दिवस तुमच्या सुख-दुःखात असतो, कोव्हिडं च्या काळात काही लोक दार बंद करून होते पण मी तुमच्या मदतीला आलो.कारण माझी माय-बाप जनता अडचणीत असताना मी घरात न बसता तुमच्या सोबत होतो.कुकडी चा पाणी सोडण्याचा प्रश्न होता तो आपण ना.जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून तात्काळ सोडवला.
यावेळी उपस्थित नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, सुदाम पवार,राहुल झावरे, अर्जुन भालेकर, बापू शिर्के, जितेश सरडे, डॉ. बाळासाहेब कावरे, पोटघन मेजर, सतीश भालेकर, बाळासाहेब लंके, शिवाजी लंके, डॉ. सचिन औटी, सुभाष,शिंदे, बाबा पठारे, हरिभाऊ पवार, सरपंच भास्कर सुपेकर, मोहन पठारे, पांडुरंग पठारे, कुंडलीक पठारे, शंकर पठारे, डॉ. अर्जुन पठारे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते,सहकारी,पदाधिकारी, व समस्त ग्रामस्थ पठारवाडी कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment