ढोलकी डफ तुणतुण्याच्या गजरात पारनेर शहरात फुलणार भक्तीचा मळा...

पारनेर : श्री सत्य अविनाश पारखपद समाज पारनेर आयोजित , सालाबादा प्रमाणे सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू व सद्गुरु ब्रह्मनिष्ठ हरिदास महाराज चौरे यांचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा अठरावा पुण्यतिथी सोहळा पारनेर येथे जामगाव रोड येथे आत्मज्ञानी गणपत बाबा मठामध्ये बुधवार (ता. 30) होत आहे . 


कोरोना विषाणूच्या जैविक महामारीमध्ये लॉक डाउन असल्याकारणाने गेली दोन वर्ष या धार्मिक कार्यक्रमावर जमावबंदी आसल्या कारणाने सर्व धार्मिक सोहळे बंद होते. परंतु यावर्षी किसन बाबा चौरे यांचा महाराष्ट्रभर असणारा शिष्य सांप्रदायांनी या वर्षी पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठ या ठिकाणी सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्याचे आयोजन केलेले आहे .

सद्गुरु किसन बाबा चौरे यांचे अध्यात्मिक अधिष्ठान हे वेगळ्या स्वरूपाचे होते. संसारिक जीवन जगत असताना गुरुज्ञानाचा अवलंब करून परमार्थिक सुख कशाप्रकारे अनुभवावे यासाठी सद्गुरुचा साधकाच्या जीवनात कशाप्रकारे लाभ होतो. हे किसन बाबांनी आपल्या जीवनात दाखवून दिले. 

आत्मज्ञानी गणपत बाबांच्या अध्यात्मिक कार्यात आपले आयुष्य घालवून योग साधनेतून आनंदी जीवन कसे जगावे त्या साठी जीवनात सद्गुरु पदाचे महत्त्व काय असते याची जाणीव आपल्या शिष्य मंडळांना पटवून दिली .

संपूर्ण महाराष्ट्रभर किसन बाबांचे शिष्य मंडळ पसरलेले आहे . समाजातील जातिभेद अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती मोडण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुपदाचा वापर करून शिष्य गणांना परमार्थिक सुखाची प्राप्ती करून दिली.

अहमदनगर जिल्हा सह कोल्हापूर , सातारा , सांगली , पुणे या सह महाराष्ट्रात विविध ठिकाणी ढोलकी डफ तुनतुन्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व समाज प्रबोधनपर कार्य करणारे हे सत्य अविनाश पारखपद समाज असून इतर जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त हे पारनेर मध्ये या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमतात.

पारनेरच्या बाजारपेठेतून सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूकीच्या माध्यमातून अध्यात्मिक भेदिक भजने व कलगी तुऱ्याचा सामना या लोककलेच्या माध्यमातून पारनेर शहरात पारनेरकरांना अनुभवयास मिळतो.व संपूर्ण पारनेर शहर हे भक्तीमय होऊन जाते . तो सोहळा बुधवारी होत आहे.

दुपारी सत्संग भेदीक गायन भजन दुपारी ३ ते ६ वा. पारनेर शहरातुन सद्गुरू प्रतिमेची भेदीक, गायन, लेझिम डावासह मिरवणूक सायंकाळी सहा ते सात वाजेदरम्यान पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सद्गुरू पादुका पुजन व सायंकाळी सात ते आठ वाजता महाप्रसाद रात्री आठ ते सकाळपर्यंत अध्यात्मिक भेदीक कलगीतुरा कार्यक्रम

रात्री ८ ते सकाळ पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत भेदीक शाहीरांचा सवाल जवाबाचा कलगी तुऱ्याचा कार्यक्रम होईल. कोल्हापुर, सांगली, अहमदनगर, पुणे, सोलापुर इ. ठिकाणाहुन नामांकीत शाहीर आपली सेवा सादर करणार आहेत. 

तरी आत्मज्ञानी गणपत बाबा मठ, जामगाव रोड, पारनेर येथे सदर कार्यक्रमास उपस्थित राहून परमार्थिक सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  सद्गुरु बबनदादा चौरे , जेष्ठ शाहीर निजामभाई शेख व समस्त सत्य अविनाश पारख पद समाज पारनेर यांच्या कडून करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post