पारनेर तालुका म्हणजे सेनापती बापट, पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका. सद्गुणांची खाण असलेल्या या तालुक्यातील एक अप्रतिम रत्न म्हणजे प्रविण ठुबे.
संघटनात्मक काम करत असताना आपल्या वाटचालीत समाजमनांच्या दुःखावर फुंकर मारण्याचे कार्य प्रविणदादांनी अनेकदा केले. आपल्या व्यक्तीगत जीवनातील अनेक सुखद प्रसंगात सामाजिक बांधिलकी जपत तन मन धन अर्पण करणारे हे व्यक्तीमत्व पारनेर तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असणाऱ्या चिमुरड्यांसोबत वाढदिवसाचा कोणताही डामडौल केला नाही.
त्यांनी अतिदुर्गम असणाऱ्या १९ शाळेमध्ये ज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या चिमुरड्यांचा उन्हाचा दाह कमी व्हावा. त्यांना थंडगार हवा मिळावी म्हणून 19 शाळांना सिलिंग फॅनचे वाटप केले. वैचारिक व सृजनशील व्यक्तिमत्व असलेल्या या दृष्ट्या नेत्याने आजपर्यंत आपल्या जडणघडणीत अनेकांचे अश्रू पुसण्याचे अतुलनीय कार्य केले.
जगावर कोरोना महामारीचे संकट घोंघावत असताना लसीकरणासाठी अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनास दिलेली आर्त हाक जीवाच्या आकांताने धडपड करणारा सुज्ञ ग्रहस्थ विसरला तरच नवल..! तालुक्यातील सर्व कोविड सेंटरची गरज लक्षात घेऊन आव्हानात्मक परिस्थितीत महाअन्नदान संकल्प अभियान राबविले.
कोकणवासियांवर जेव्हा निसर्गाचा कोप झाला, प्रत्येकजण हळहळला. त्यावेळी कोकण पुण्यभूमीतील उध्वस्त संसार पुन्हा बसविण्यासाठी शिक्षक परिषद या कुटुंबाचा प्रमुख या नात्याने जिल्हाभरातून चार लाखांपेक्षा अधिक निधी जमा करून कपड्यालत्यांसह संसार उपयोगी सामानाचे टेम्पो ही याच विवेकशील नेतृत्वाने पाठवले.
आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून मिळवलेल्या विश्वासाचे द्योतक म्हणुणच की काय कुणास ठाऊक.. ? पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकरी कन्यांची धडपड या जाणत्या नेत्याच्या नजरेतून कशी सुटेल ? या धावपटूंना मदत म्हणून जिल्हाभरातील बांधवांनी अवघ्या तीनच दिवसात १,२१,५०१ रुपयांचं दान पदरात टाकलं.
कोरोना महामारीच्या काळात अनेक संसर्गग्रस्त कुटुंबांसाठी प्रविणदादा देवदूत ठरले. तरीही दुर्देवाने दगावलेल्या बांधवांच्या कुटुंबांना आधार देत या बांधवांच्या स्मृती सदैव स्मरणात रहाव्यात यासाठी "एक झाड आठवणीचे" हा उपक्रम प्रभाविपणे राबवित इतरांना पर्यावरण रक्षणाचे धडे दिले.
मुख्यमंत्री सहायता निधी म्हणूण अडीच लाख रुपये रक्कमही याच काळात दिली. आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रविणदादा उर्जास्त्रोत ठरले. अशा या शिक्षक चळवळीतील जाणत्या नेतृत्वास जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
Post a Comment