विकासकामे व जनसंपर्काच्या जोरावर पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : कोळगाव गणासह तालुक्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे.  ही सर्व कामे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य पुरूषोत्तम लगड यांनी केली आहे.


लगड यांनी पंचायत समिती कार्यकाळास पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कोळगाव गणात विकासकामांचा पाऊस पडला. विविध मार्गाने निधी मिळवून गणात मोठ्या प्रमाणात कामे केली. विकासाबरोबरच जनतेशी संपर्कात ते कायम राहिले आहेत. याच बळावर पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे सूतोवाच लगड यांनी केले आहे.

13 मार्च 2022 ला पुरुषोत्तम लगड़ यांच्या पंचायत समिती सदस्य पदाची पाच वर्षे पूर्ण झाली. सदर पाच वर्षांमध्ये माजी सभापती पुरुषोत्तम लगड़ यांनी कोळगाव गणामध्ये अनेक विकास कामे मंजूर केली. 

परंतु सदस्य पदाची मुदत संपण्यापूर्वी सन २०१९-२० मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मग्रारोहयो योजनेअंतर्गत VSTF योजनेत कोळगाव व चिखली या गावांची निवड करून कामांचे नियोजन केले. 


या योजनामध्ये मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेली सर्व कामे घेता आली सदर विकास कामांमध्ये निमजेवाड़ी, वैतागवाडी, वेठेकर वाडी पांढरेवाडी, जगताप मळा, पांढरेवाडी (नलगे वस्ती) याठिकाणी पुलांची कामे मंजूर केली. (एकूण रक्कम 29 लाख 89 हजार) तसेच कोळगाव गावात शाळांच्या संरक्षक भिंतींची कामे मंजूर केली. 

त्यामध्ये भापकर वाडी, जगताप मळा, धनगरवाडी, नाहेर मळा, मानमोडी, मोहरवाडी, लगडवाडी, वेठेकर वाडी, साबळे मळा, चिखली, चिखली ( गाड़ेकर माळा) या ठिकाणी शाळेची संरक्षक भिंतींची काम मंजूर केलेली एकूण रक्कम 78 लाख तसेच कोळगाव भापकरवाडी ते  साकळई रस्ता खडीकरण व मुरमीकरण एकूण रक्कम 11 लाख 80 हजार मंजूर केली. 

तसेच रोजगार हमी योजनेतून कोळगाव गणामध्ये वैयक्तिक लाभाची कामे त्यामध्ये विहिरी, गोठे, शेळी निवारा केंद्र शोषखड्डे कामे मंजूर करून दिली. त्याचप्रमाणे पंचायत समिती 15 वा वित्त आयोग मध्ये कोळगाव गटात मंजूर केलेल्या कामांमध्ये कोळगाव , कोरेगाव सुरेगाव ,घारगाव आणि कोथूळ या गावांमध्ये बाकडे बसविणे एकूण रक्कम 7 लाख 25 हजार पिंपळगाव पिसा खरातवाडी आणि घुटेवाडी याठिकाणी आरो फिल्टर बसवणे एकूण रक्कम 8 लाख 15 हजार कोळगाव घोंडगेवाडी.

विसापूर (शिंदे मळा) ,घुटेवाडी याठिकाणी पुलांची कामे एकूण रक्कम 5 लाख 50 हजार, --कोळगाव सुतार गल्ली, पांढरेवाडी घुटेवाडी व कोरेगाव या ठिकाणी बोरवेल व मोटार बसविणे 4 लाख रुपये कोळगाव पंचायत समिती गणांमध्ये नाम फलक व कचराकुंडी बसविणे 4 लाख 33 हजार कोळगाव येथील आठखांब गणपती मंदिर सभा मंडप बांधणे 2 लाख रूपये, कोळगाव सपाटेवस्ती/ रामवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे 2 लाख.

कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालयात मुतारी बांधणे 2 लाख 57 हजार ,पारगाव येथे रस्ता दुरुस्ती करणे दीड लाख रुपये पारगाव(खेतमाळीस वाडी) येथे भुयारी गटार करणे 2 लाख 25 हजार तसेच  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोळगाव येथील बस स्टँड, वीर भवन, माऊली मंदिर, व मुंगुसगाव या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणे 12लाख रुपये अशाप्रकारे एकूण एक कोटी 71 लाख 24 हजार रुपयांची विकासकामे मंजूर केली.

या कामावर बरोबरच यापूर्वी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून या विकास कामांच्या व जनसंपर्काच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेला विश्वासात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार लगड यांनी व्यक्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post