पुणे : शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात हे आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले की, 21 मार्चला शिवजंयती आहे. आता तारखेने साजरी झाली आणि तिथीने आहे. आपल्या शिव छत्रपतींची जयंती आहे. आपली ओळखच ती आहे. नाहीतर आपली ओळखच काय? आम्ही कोण आहोत. आम्ही सांगतो आम्ही मराठी आहोत.
मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून मराठी आहोत. मराठी भाषा बोलणारे कुठे राहतात. तो आमचा राजा जो शिवछत्रपती होऊन गेलेत तेथे आम्ही राहतो, असे ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, शिवाजी नावाचा विचार जो आहे. त्या भूमीत आम्ही राहतो. तारखेने करावी की तिथीने करावी? 365 दिवस करा. जेव्हा वाटेल तेव्हा करा. असं ही राज ठाकरे म्हणाले.
तिथीने का करतो? कारण सगळे सण आपण तिथीने साजरे करतो. प्रत्येक सण तिथीनुसार होतो. राजाचा सण आहे. नुसता जन्मदिवस नाही. सण म्हणून तिथीने साजरा करावी. 21 तारखेला महाराष्ट्रभर शिवजयंती धडाक्यात साजरी करावी. अशी आशा अपेक्षा बाळगतो, असे राज ठाकरे म्हणाले.
Post a Comment