राणे पितापुत्र तब्बल नऊ तास पोलिस ठाण्यात....

मुंबई : अभिनेता सुशांत राजपूतची मॅनेजर  प्रकरणात भाजपचे केंदीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांचा मालवणी पोलिसांनी काल तब्बल नऊ तास जबाब नोंदवला.


त्यानंतर आता शिवसेना आणि नारायण राणे वादाचा नवा अंक सुरु झाला आहे.  मुंबई महापालिकेकडून नारायण राणे यांच्या  जुहू इथल्या अधीश बंगल्याची तपासणी व मोजमाप करण्यात आले होते.

या बंगल्याचे बांधकाम सिआरझेडचे उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबई महापालिकेचे पथक राणे यांच्या बंगल्यावर धडकलं होते. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. 

जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं नमूद करत मुंबई महापालिकेने ही नोटीस काढली असून सात दिवसात आपलं म्हणणं सादर करा असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.

महापालिकेच्या पथकाला नारायण राणे यांच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नारायण राणे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी आता वाढत चालल्या असल्याचे यावरून दिसून येत आहे. या अडचणी कमी होणार की आगामी काळात वाढणावर चर्चा सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post