आढळगावातील स्मशानभूमीसाठी वाढीव निधी देण्यासाठी प्रयत्न करणार..

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : आढळगाव हे गटातील सर्वात मोठे गाव आहे. या गावातील स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय होती. या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी आमदार बबनराव पाचपुते व मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांनी "तेज वार्ता" शी बोलताना सांगितले. 


आढळगाव येथील स्मशानभूमीच्या कामाची जिल्हा परिषद सदस्य पंचशिला गिरमकर यांनी पहाणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत,  जालिंदर बोडखे, संदीप काळाणे, संतोष सोनवणे,  संदीप सूर्यवंशी, रंगा (नाना) डोके, पत्रकार शरद शिंदे आदी उपस्थित होते.

गिरमकर म्हणाल्या की, गटातील सर्वात मोठे गाव आहे. या गावात मागील पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पण सर्वात महत्त्वाचे काम होते. ते स्मशानभूमी चे या गावची स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय होती. 

या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी आमदार निधीतून व मी जिल्हा परिषद निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे. आज या स्मशानभूमी चे काम अंतिम टप्प्यात आहे. 

हे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. ते पाहून समाधान वाटतेय. या कामास निधीची कमतरता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यात येईल, असे गिरमकर म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post