नगर ः रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाद्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदी रिक्त झालेल्या जागी नगर जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.
यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. त्यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते हे पहावं लागणार आहे.
या रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या विषयी सध्या चर्चा सुरु झालेली आहे. या पदावर नगर जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातून या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ही संधी दक्षिणेत दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा दक्षिणेत होऊ शकतो. त्यामुळे आता पक्षाच्या नेत्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
दक्षिणेतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यांना संधी दिल्यास जिल्ह्याबरोेबरच राज्यात पक्षाची बांधणी होण्यास मदत होईल.
Post a Comment