श्रीगोंदा : तरस अन् बिबट्या या वादात ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. वनविभागाने नेमके काय आहे, हे स्पष्ट सांगून नागरिकांना बिबट्यापासून बचाव कसा करायचा याचे मार्गदर्शन करण्याऐवजी काही कर्मचारी आढळगावमधील ग्रामस्थांशी वाद घालवत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांचाही वावर नेहमी दिसतो गेल्या आठवड्यापासून तर बिबट्याने अजनूज, आनंदवाडी, वेळू भागात धुमाकूळ घातला आहे.
दोन दिवसांपूर्वी आनंदवाडी येथे ऊसतोडणी मजुराच्या मुलावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास काळे वस्ती वरील सोमनाथ काळे व त्यांचे बंधू पिकाला पाणी देत होते. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वस्तीतील तरुणांनी एकत्र येऊन बिबट्याचा शोध घेतला त्यावेळी तो लिंबाच्या बागेतून त्याने धूम ठोकली.
याबाबत नागरिकांनी वन विभागाच्या अधिकार्यांना फोन करून माहिती दिली. सकाळी वन विभागाचे वनमजुरांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर त्यांना ते ठशांचे फोटो काढून ते वरिष्ठांना पाठवले. त्यांनी ते ठसे बिबट्याचे नसून तरसाचे असल्याचे आपल्या कार्यालयात बसून सांगितले.
याच मुद्द्यावरून आता वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांमध्ये वादावादी सुरू झाली आहे. या ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आढळगावमधील ग्रामस्थांमधून होत आहे.
Post a Comment