नगर : घरात घुसून बळजबरीने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर येमूल (पूर्ण नाव माहिती नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरामध्ये असताना आरोपी हा बळजबरीने त्यांच्या घरात घुसला.
त्यानंतर पिडीतेबरोबर तो गैरवर्तन करून तेथून निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंग करणारा शंकर येमूल याच्या विरोधात फिर्याद दिली.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संभाजी बडे करीत आहेत.
Post a Comment