अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यात बिबट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आनंदवाडी येथे उसतोडणी मजुराच्या मुलावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली होती.
आज आढळगाव येथे बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांचाही वावर नेहमी दिसतो गेल्या आठवड्यापासून तर बिबट्याने अजनूज, आनंदवाडी, वेळू भागात धुमाकूळ घातला आहे.
दोन दिवसांपूर्वी आनंदवाडी येथे उसतोडणी मजुराच्या मुलावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आज रात्री 11 वाजेच्या सुमारास काळे वस्ती वरील सोमनाथ काळे व त्यांचे बंधू पिकाला पाणी देत होते.
त्यावेळी त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वस्तीतील तरुणांनी एकत्र येऊन बिबट्याचा शोध घेतला त्यावेळी तो लिंबाच्या बागेतून त्याने धूम ठोकली.
त्यानंतर भाजपचे युवा सरचिटणीस सतीश काळे यांनी वनविभागाला संपर्क साधला पण संबंधित अधिकार्यांनी फोन उचलायची तसदी घेतली नाही. पण बिबट्याचा दर्शनाने नागरिक भयभीत झाले असताना वनविभाग झोपेत आहे, अशी प्रतिक्रिया सतीश काळे यांनी दिली.
Post a Comment