पारनेर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ होईल,अशी टीका करीत आमदार निलेश लंके यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील ४८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार निलेश लंके , संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ , पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी, सरपंच किरण पानमंद, उपसरपंच गोविंद साबळे , अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोकशेठ कटारिया, बाजार समितीचे माजी सभापती कुंदनकाका साखला, आत्मा कमीटीचे अध्यक्ष ॲड. राहुल झावरे, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार लंके बोलत होते. यावेळी म्हस्केवाडी ग्रामस्थांच्या वतीने पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई भालेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच म्हस्केवाडी येथील सोसायटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच नूतन संचालक मंडळाचा बिनविरोध निवडीबद्दल आमदार लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुंदनकाका साखला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, माजी सभापती सुदाम पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जितेश सरडे, प्रसन्ना उद्योग समूहाचे अध्यक्ष किरणशेठ डेरे, आळकुटी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पुंडे, रांध्यांचे उपसरपंच संतोष काटे, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके, सत्यम निमसे, संदीप चौधरी, शिरापुरचे सरपंच हनुमंत भोसले, उद्योगपती गंगाधर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व निघोज तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, माजी सरपंच सावळाशेठ पानमंद, दत्तात्रय म्हस्के, सुदाम म्हस्के, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, ठकाराम लंके, मंगेश लंके, ठेकेदार बाबाशेठ लंके,माजी उपसरपंच रामदास रसाळ, युवानेते दिलीप ढवण, अस्लमभाई इनामदार, युवा नेते रुपेश ढवण आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लंके यावेळी म्हणाले गेली दोन वर्षात मतदासंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. मात्र विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. विरोधक दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. विकासकामे कोण करतो याची जाणीव जनतेला असल्याने आपण निर्धास्त आहोत.
जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली म्हणून काही जण दहावे लग्न या कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेची आपुलकी मिळवण्याचा प्रयत्न करतात.मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे निवडणुका जिंकण्यासाठी संघटन व राजकारण महत्वाचे असते एकटे फिरुन जनमत मिळवणे अवघड असते.
म्हस्केवाडी येथील ४८ लाख रुपयांच्या विकासकामांचे सर्वं श्रेय जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांचे आहे.आपल्याला त्यांनी भुमीपूजन कार्यक्रमाला बोलावले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
या ४८ लाखांत फक्त १५ लाखाचा सभामंडप आपण दिला या कामाचा पाठपुरावा सुद्धा सचिन पाटील वराळ यांनी केला आहे.निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून सचिन पाटील वराळ हे एक कार्यक्षम युवा नेतृत्व असून यापुढेही आपण अशाच युवकांना पाठबळ देउन मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार लंके यांनी दिली आहे.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले गेली दोन वर्षाच्या कारकिर्दीत आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे.यापुर्वी कुणालाही असे काम करता आले नाही.
अशाप्रकारे कार्यक्षमतेने काम करण्याची जबाबदारी आमदार लंके यांनी पार पाडली आहे.विरोधक मात्र फुकटच्या कामाचे श्रेय घेतात ही वृत्ती विरोधकांनी सोडून द्यावी.सोशल मिडीयाचा वापर कोण कसा करतो हे जनतेला चांगलेच अवगत आहे.निघोज व परिसरात या सहा महिन्यांत आमदार लंके यांनी सहा कोटीचा निधी विकासकामांसाठी दिला आहे.
त्या अगोदरच्या दिड वर्षाच्या कारकिर्दीत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी देऊन जिल्हा परिषद गटाला विकासकामांच्या माध्यमातून पाठबळ देउन आमदार लंके यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुंदनकाका साखला,अशोकशेठ कटारिया, सरपंच किरण पानमंद, उपसरपंच गोविंद साबळे,सुदाम म्हस्के आदिंची भाषने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप म्हस्के यांनी केले शेवटी उपसरपंच गोविंद साबळे यांनी आभार मानले.
आजच्या युवा पदाधीकाऱ्यांनी मावळलेल्या विरोधी पुढाऱ्यांकडे लक्ष न देता निलेश लंके यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम केल्यास तुमचे राजकीय भविष्य उज्ज्वल राहील अशी सुचना आमदार निलेश लंके यांनी करताच उपस्थीतांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या सूचनेला दाद दिली.
Post a Comment