शिक्षकांमध्ये संभ्रम... पडताळणीला प्रमाणपत्र गेले 48 अन् बोगसच्या यादीत दाखविले जातात 149 कसे...

नगर : राज्यभरातील टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये काही प्रमाणपत्र बोगस निघाल्याची चर्चा सुरु झालेली आहे. मात्र ते बोगस प्रमाणपत्रावाले कोण शिक्षक आहेत, याची माहिती शिक्षक घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


टीईटी प्रकरण उघड झालेले आहे. त्यामुळे टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यातून प्रमाणपत्र मागविण्यात आले होते. 

नगर जिल्हायातून सुमारे 48 प्रमाणपत्र पाठविण्यात आले होते. मात्र आता समाद माध्यमावर 149 प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती प्रसारित होत आहे. त्यामुळे सर्वजण आश्चर्य चकीत होत आहे. 

राज्यातील तब्बल 7880 शिक्षक बोगस असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 338 शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समाज माध्यमावर फिरत आहे. यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post