नगर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा बैठकीत मुख्याध्यापक संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी शाळा मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील मुख्याध्यापक महादेव चोभे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळसाहेब कदम यांनी केली.
अहमदनगर जिमखाना एमआयडीसी येथे राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अहमदनगर जिल्हा संघ व ऐक्य मंडळाची बैठक झाली.
जिल्हा संघाच्या बैठकीत प्रामुख्याने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या आवाहनानुसार जूनी पेन्शन योजनेसह अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या धरणे आंदोलन बाबत आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे उशिरा होणारे वेतन, रखडलेली वरिष्ठ व निवड श्रेणी यांच्यासह अन्य प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा होऊन या प्रश्नांबाबत संघाने पाठपुरावा सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली.
तसेच येत्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये ऐक्य मंडळाच्या भूमिकेविषयी सखोल चर्चा झाली. लवकर ऐक्य मंडळाची जिल्हा सुकाणू समिती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ऐक्य मंडळाचे जिल्हासरचिटणीस सुरेश नवले यांनी दिली.
जिल्हा संघाच्या या बैठकीस राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे, विलास लवांडे, मधुकर डहाळे, जिल्हाचिटणीस प्रदिप चक्रनारायण, जिल्हा संघटक लाजरस कसोटे, माजी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण चेमटे,अखिल पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, प्राथमिक शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, सुखदेव डेंगळे, शहाजी जरे, महादेव चोभे, पांडुरंग झरेकर, प्रविण शेळके, विनायक गोरे,विश्वनाथ कदम, रवींद्र दरेकर, सुनील पठारे, लहू फलके , बबन जऱ्हाड, संतोष ठाणगे, नितीन गायकवाड, संजय वाघुले आदी उपस्थित होते.
Post a Comment