लाच घेताना मुख्याध्यापकाला पकडले...

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर  येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला  लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.


पगार काढून देण्यासाठी मुख्याध्यापकाने संबंधिताकडे 10 हजारांची लाच मागितल्याची घटना घडली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

यानंतर लाच स्वीकारण्याची तारीख ठरली. याच दिवश लाच लुचपत विभागाने माणिकलाल रोहिदास पाटील नामक मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले.

नाशिक जिल्ह्यातील वैतरणानगर येथे एक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे तक्रारदार कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. गेल्या दहा वर्षांपासून ते कामावर आहेत.

त्याचे नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या काळातील वेतन थकले होते. त्यासाठी मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटील या मुख्याध्यापकाने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर लाचलुचपत विभागाने शिताफीने या मुख्याध्यापकाला ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्यामार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्यासह पो.ना.अजय गरुड, पो.ना.किरण आहिरराव , पो.ना.एकनाथ बाविस्कर ,पो. हवा. संतोष गांगुर्डे यांनी हा सापळा यशस्वी केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post