मुंबई : टेलिकॉम कंपनी व्हीआयने ग्राहकांसाठी खास डेटा व्हाऊचर घेऊन आली आहे. यामध्ये ग्राहकांना सर्वात स्वस्त दरात डेटा उपलब्ध होईल. या पॅकची किंमत 100 रुपयांपर्यंत असून 19 रुपयांपासून सुरु होते.
सर्वात स्वस्त 19 रुपयांच्या व्हाउचरमध्ये ग्राहकाला एक जीबी ते नऊ जीबीपर्यंत डेटा उपलब्ध होणार आहे. व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते. ग्राहकांना अतिरिक्त डेटा हवा असल्याचं कंपनीचे स्वस्त 4G डेटा व्हाउचर वापरू शकतात.
येथे ग्राहकाला कंपनीच्या 100 रुपयांच्या स्वस्त व्हाउचरबद्दल माहिती देत आहोत. त्यांची किंमत 19 रुपयांपासून सुरू होते आणि 98 रुपयांपर्यंत आहे. तसेच हे व्हाउचरवर एक दिवस ते 28 दिवसांची वैधता मिळते.
व्होडाफोन व आयडियाचे सर्वात स्वस्त फॉरजी डेटा व्हाउचर 19 रुपयांचे आहे. यामध्ये ग्राहकांना 24 तासांच्या वैधतेसह फक्त एक जीबी डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान ग्राहक हा डेटा कधीही वापरू शकतो.
व्होडाफोन-आयडीयाचे दुसरे फॉरजी डेटा व्हाउचर 48 रुपयांचे आहे. यामध्ये ग्राहकांना 21 दिवसांसाठी एकूण दोन जीबी डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान ग्राहक हा डेटा कधीही वापरू शकतो.
58 रुपयांच्या फॉरजीबी डेटा व्हाउचरची खास गोष्ट म्हणजे याची वैधता सुमारे एक महिना आहे. यामध्ये ग्राहकाला 28 दिवसांसाठी तीन जीबी डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान ग्राहक हा डेटा कधीही वापरू शकतो.
यादीतील चौथे आणि शेवटचे फॉरजी डेटा व्हाउचर 98 रुपये किमतीचे आहे. या प्लॅनमध्ये 21 दिवसांची वैधतेसह नऊ जीबी डेटा दिला जातो. वैधतेदरम्यान तुम्ही हा डेटा कधीही वापरू शकता.
Post a Comment