न्यूझीलंड : भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकपमधील बदला घेतला आहे. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला आहे. भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 107 धावांनी पराभव केला आहे.
महिला भारतीय संघाने पाकिस्तानला 245 धावांचे आव्हान दिलं होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना 137 धावांमध्ये पाकिस्तान संघाला गारद केले. यामध्ये गोलंदाज राजेश्वरी गायकवाडला चार बळी मिळाले. तर झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.
पाकिस्तानकडून सिद्रा अमीन हिने सर्वाधिक म्हणजेच 30 धावा केल्या. कर्णधार बिस्माह मारूफही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली. अवघ्या 15 धावांमध्ये ती माघारी पतरली.
दरम्यान फलंदाजी करताना महिलांच्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. शेफाली वर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. शेफाली अवघ्या चार धावांवर बाद झाली.
स्मृतीने 75 चेंडूमध्ये 52 धावा करत भारतीय संघाला चांगल्या धावा उभारण्यात मदत केली. यानंतर पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांनी भारतीय संघाच्या डावाची कमान सांभाळली. दोघींनीही उत्तम अर्धशतकं झळकवत स्कोर 200 पार नेला.
Post a Comment